टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील महत्त्वाची असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळवा यासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला असुन टेंभुर्णी शहर बंद ठेवून येणाऱ्या जि.प.पंचायत समीती, ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे निवेदन जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे, जाफराबाद तहसीलदार सारीका भगत यांना लेखी निवेदन देवून इशारा देण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टेंभुर्णी नगरपंचायतीला दर्जा मान्य ता देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने बहुमताने दि.२८ एप्रिल २०२५ रोजी ठराव क्रमांक ०७ प्रमाणे मंजुरी दिलेली असुन त्यानुसार समस्त गावकरी मंडळीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेला रितसर निवेदन दिलेले होते.यामध्ये दि.२० मे २०२५, दि. २८ मे २०२५,दि.३ जुन २०२५ रोजी निवेदन सादर केले होते.त्यानुसार मा.विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांनी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना संदर्भ क्रमांक ०१ नुसार वस्तूस्थीती दर्शक तपशीलवार सध्या स्थितीचा अहवाल नुसार शासनास पाठविण्याचा आदेश दिले होते.त्यानुसार ग्राम विकास अधिकारी यांना संदर्भ क्रमांक ०२ नुसार प्रपत्रामध्ये चार प्रतीत प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेश केलेले असून त्यांनी विस्तार अधिकारी पंचायत यांची विशेष नियुक्ती केलेली आहे.
पण मुद्दामहून राजकीय द्वोषापोटी ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव हे बळी पडले असुन सदर प्रस्ताव देण्यास जाणुनबुजून विलंब करीत असल्याने जनतेचा रोष वाढतच चालला आहे.मुद्दामहून ते रजेवर गेले असुन वेळकाढूपणा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जिल्हा परीषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्राम विकास अधिकारी राजकीय दबावामुळे हा प्रस्ताव लांबणीवर टाकीत आहे.हा प्रस्ताव संबंधित संस्थेला दि.१५ जुलै २०२५ रोजी पर्यंत सदर प्रस्ताव प्रपत्रामध्ये चार प्रतीत दाखल करण्याचे आदेश करावे नसता आम्ही सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी लोकशाही मार्गाने गावबंद करून येत्या निवडणुकीत बहीष्कार टाकु असा इशारा टेंभुर्णीचे माजी सरपंच विष्णू जमधडे, जनार्धन झोरे , सर्जेराव कुमकर, वकील किशोर गायकवाड, संजय राऊत पत्रकार, रामेश्वर खांडेभराड, मनोहर जाधव,दत्तु सुद्रीक, विष्णू मगर, अंकुश देशमुख,शेख बाबु, सुनील देशमुख, भगवान देशमुख,जगनराव डोमाळे, मुश्ताक बागवान,मन्सुर बागवान, शंकर भागवत, ज्ञानेश्वर उखर्डे,पी.जी.तांबेकर , बालाजी मुळे, भाऊसाहेब अंभोरे,महादु धनवई, संतोष शिंदे,रवी खरात, किसन मघाडे, प्रदीप मघाडे, गौतम छडीदार,किसन जोशी, रंगनाथ जोशी यांनी दिलेल्या निवेदनात सहृया असुन या निवेदनाच्या प्रती जालना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंचायत राज अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांना देवून कडक इशारा देण्यात आला आहे.
काही सत्ताधारी नेत्यांना टेंभुर्णी सध्या नगरपंचायत होऊ नाही म्हणून आडकाठी सुरू केली आहे कारण नगरपंचायत झाली तर जिल्हा परिषद पदाची स्वप्ने भंग होईल अशी.. मनोमनी खंत आहे.. तेव्हा.. शासनाने याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सविस्तर आवाहल मागवून नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न करावे.. ...माजी सरपंच विष्णू विठोबा जमधडे टेंभुर्णी
स्थानिक नेतृत्व नसल्याने आम्ही वंचित राहिलो जिल्ह्यातील अनेक लहान गावांना नगरपंचायत दर्जा देण्यात आला परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहेत आता आमच्या संयमाचा बांध फुटणार आहे याची शासनाने दखल घ्यावी......जनार्धन झोरे टेंभुर्णी
टेंभुर्णी नगरपंचायत झाल्यास टेंभुर्णी शहराचा सार्वजनिक विकास मोठ्या प्रमाणावर होईल. टेंभुर्णी करांना नेहमी भेडसावणारा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटेल गावातील गरीबांना घरकुल योजनांचा लाभ मिळेल..तरुणांना उघोग मिळेल नागरी सुविधा उपलब्ध होईल रावसाहेब अंभोरे चेअरमन.. टेंभुर्णी
Social Plugin