Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूलमध्ये शेवग्याच्या रोपांचे वाटप



 एक पेड माँ के नाम उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद 

 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव  येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वृक्ष लागवडीमध्ये व वृक्ष संवर्धनामध्ये हिरहिऱीने भाग घेतात. शेवगा या अतिशय औषधी असणाऱ्या वृक्षाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे त्याचे औषधी गुणधर्म व त्याची जपणूक करण्याकरता आर्ट ऑफ लिविंग पुसेगाव व श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्वप्रथम याविषयी विद्यार्थ्यांच्या जागृती करण्यात आली. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेचे नेहमीच नवनवीन उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरले आहेत.  

 यानिमित्ताने श्री प्राचार्य दत्तात्रय गोफने यांच्याकडे श्री विलास चव्हाण यांनी शेवग्याची रोपे सुपूर्त केली." एक पेड माँ के नाम' हा उपक्रम सर्वांनी यशस्वी करण्याचा निश्चय केला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शेवग्याची रोपे वाटून त्याची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले.

 या कामी श्री मोहनराव गुरव, श्री अजित काळे, श्री विक्रम कांबळे, सौ स्वाती जाधव, सौ अमृता जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.