सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली येथील १५ वर्षीय युवकाचा नदीत पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा करून अंत झाला, युवकाचे नाव सोहम प्रमोद मोहूर्ले असूनपोहण्यात तरबेज असलेला सोहम आपल्या दोन मित्रांसोबत रविवारी दिनांक २७/०७/२५ सकाळी ११ वाजता चीमढा नदीवर फिरायला गेला असता नदीत पोहण्याची त्याची ईच्छा निर्माण झाल्याने त्याने नदीत उडी घेतली परंतु नदीत भरपूर पाणी असल्याने त्याला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पोहता पोहता त्याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना मित्रांच्या समोर घडली परंतु मित्र घाबरल्या मुळे घटनेची वाच्यता त्यांनी कुठेही केली नाही, घरच्यांनी जिकडे तिकडे शोध घेतला रात्री उशिरापर्यंत सोहम घरी परत न आल्यामुळे घरच्या लोकांची चिंता वाढली शेवटी मित्रांकडून सत्य परिस्थिती समोर आली तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन सावली चे कर्मचारी आणि आपदा मदत विभागाने शोध घेतला असता सोमवारी दिनांक २८/०७/२५ ला घटना स्थळापासून काही अंतरावर सोहमचा मृतदेह सापडला. सोहमच्या मृत्यने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Social Plugin