*
डॉ. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे मूख्य नेते तथा राज्यांचे उपमूख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व शिवसेना पक्ष नेत्या व महाराष्ट्र विधान परिषद आमदार मा.भावनाताई गवळी (पाटील) यांच्या आदेशानेशिवसेना पक्ष वाढ व होऊ घातलेल्या नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणूक संदर्भातजिल्ह प्रमूख श्री.विजय खानझोडे यांच्या अध्यक्षतेखी दि. 17जूलै 2025 रोजी विश्रामगृह कारंजा येथे शिवसेनेची महत्वाची बैठक संपन्न झाली
शिवसेना तालूका प्रमूख कारंजा श्री. मंगेश पाटील मुंदे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या बैठकीत स्थानीक स्वराज संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा असे आदेशच जिल्हा प्रमूख विजय खानझोडे यांनी दिले तसेच धनूष्यबाण या शिवसेना पक्ष चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या ईच्छूकांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले
या बैठकीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हुकूम भाऊ तुर्के.युवासेना उपजिल्हाप्रमुख सुमित गोटे,राज चौधरी,दिलीप भोजराज, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील तूरक, शिवसेना शहर प्रमुख अजय मते,संदीप पाटील टेकाडे , गोपाल कडू, बबन वरगट , विजय पाटील लांडकर, संदीप भाऊ सारसकर, कारंजा मानोरा वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर,संजय पाटील शिंदे, श्याम पाटील पावडे, प्रफुल गवई,किशोर बैस, गणेश राऊत, उमेश पाटील रीठे,ॲड.संदेश जिंतूरकर, संदीप पाटील लाहे, फारुख भाई हे उपस्थित होते
Social Plugin