कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आनंदो प्लस उपक्रमाच्या माध्यमातून भाटेपुरी केंद्रावर ३ जुलै २०२५ रोजी आणि बदनापूर केंद्रावर ११ जुलै २०२५ रोजी शैक्षणिक साहित्य वाटप आणि महाचर्चा कार्यक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमात एकूण ७२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरणा मिळावी आणि करिअर संदर्भात योग्य दिशा मिळावी, या हेतूने मान्यवरांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. पाटील सर (छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बदनापूर) , श्री. निकम सर (कन्या हायस्कूल, बदनापूर) , श्री. एस. राजपूत सर (सहाय्यक प्राध्यापक, ज्ञानगंगा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बदनापूर), प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे सर (संस्थापक सचिव, अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, खनेपुरी) , डॉ. राजेंद्र राजगुडे सर (संस्थापक, जय अंबे नर्सिंग कॉलेज, जालना) ,रामदास आटोळे सर (मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भाटेपुरी) यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, मेहनत, सातत्य आणि उद्दिष्ट निर्धारणावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात महाचर्चा सत्र आयोजित करण्यात आले. यात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी, वेळापत्रक, अभ्यासाची तंत्रे, आणि ध्येय ठरवण्याचे मार्ग याविषयी अनुभव शेअर केले, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली. या प्रसंगी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जालना विभागाचे वरीष्ठ प्रकल्प अधिकारी जोमा मस्ती सर यांनी ट्रस्टचे कार्य व उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्रकल्प समन्वयक श्री. जगदीश सातपुते यांनी आनंदो प्लस प्रकल्पाची उद्दिष्टे सादर केली व पुढील नियोजनासाठी विद्यार्थ्यांना दिशा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप कैलास कोल्हे (सेंटर एक्झिक्यूटिव्ह, बदनापूर) यांनी केले. श्री. सुबोध खंडारे (SFSEP प्रकल्प समन्वयक) आणि श्री. शिवाजी काजळकर (सेंटर एक्झिक्यूटिव्ह, भाटेपुरी ) यांचीही कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लाइट ऑफ लाईफ ट्रस्टच्या समन्वयक आणि टास्क फोर्स स्वयंसेवकांच्या टीमने केले. शिक्षक, पालक, विशेष अतिथी, गुणवंत विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.
Social Plugin