प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ
देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होत असलेला अवैध रेती उपसा गेल्या अनेक दिवसापासून वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे आम्ही या संदर्भात प्रशासनाला अनेक निवेदने दिले आंदोलने केली प्रशासन थातूरमातूर कारवाई करते परंतु मुळावर घाव घालायला तयार नाही त्यामुळे सदर रेती उत्साह कुठेच थांबायला तयार नाही या अवैध रीती वाहतुकीमुळे आमच्या रस्त्यांची वाट लागली असून विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईना शेतकऱ्यांना शेतावर जाता येईना गावकऱ्यांना तालुक्याला येणे सुद्धा जीगिरीचे झाले आहे अनेकदा अनेक अपघात झाले अनेकांना अपंगत्व आलं अनेक जणांचे जीव गेले अजून किती प्रसंग घडण्याचे आपण वाट पाहत आहात रेतीमाती यांची मजुरी वाटली असून हळूच चाला असे गावकरी प्रेमाने जरी सांगायला गेले तरी रेतीवाले त्यांच्या अंगावर जीवे मारण्यासाठी धावत येत आहे या अगोदर आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल आमच्या गावकऱ्यांचा समक्ष रेतीमाफी यांनी मारले आपल्या तलाठी मंडळ अधिकारी यांना सुद्धा मारल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले प्रशासनासोबत जर यांची अशी वागणूक असेल तर आम्हा गावकऱ्यांना किती त्रास होत असेल आपल्याकडून होत असलेली कारवाई नगण्य असून तिचा काहीच परिणाम होत नाही आपल्या प्रशासनातील काही झारीचे शुक्राचार्य असणारे अधिकारी कारवाई करण्याचे नावाखाली फक्त पैसा कमावण्याच्या नादात बेधुंद झाले आहे आपले एनडीआरएफ धरणात अनेकदा गेले परंतु आपल्या लक्षात बोटी आल्या नाही किंवा बोटी सापडल्या तरी त्याच्यावर सक्षमपणे कारवाई करता आली नाही हे आपल्या प्रशासनाचे अपयश पाहता आपल्या प्रशासनाची मानसिकता नाही का कारवाई करण्याची आता मी थांबणार नसून आमची स्पष्टपणे मागणी आहे की १)ज्यांच्या बोटी आहेत ज्यांच्या शेतात रेतीचे गड्डे आहेत ज्यांच्या शेतातून रस्ते आहेत त्यांच्यावर तात्काळ बोजा चढवा सदर गड्डे आणि क्षेत्र रस्त्यांचा एक समिती नेमून सर्व पंचनामा करून अहवाल मागवा
२) आमच्या रोडने फक्त भरतीची गाडी नव्हे तर रिकामी गाडी सुद्धा जर दिसली मंडप गाव हद्दीमध्ये तरी तिच्यावर कारवाई करावी
३) ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सदर रेती उपसा होतो अशा तलाठी मंडळ अधिकारी पोलीस पाटील यांना तात्काळ निलंबित करावे व सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी
४) पोलीस स्टेशन मार्फत रितीमापी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी
४) या अगोदर आपण बोजा चढवणे संदर्भात जे आदेश काढले होते त्याचे अजून अंमलबजावणी झाली नाही त्या तयारीची माफी यांच्या सातबारावर तात्काळ बोजा चढवण्यात यावा
या व इतर मागण्या आपण गांभीर्यपूर्वक घेऊन तातडीने पूर्ण न केल्यास आज पासून 28 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने अभिनव आंदोलने केल्या जातील व 28/7/025 तारखेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमच्या सहकार्यासह आमरण उपोषणाला बसू याची नोंद घ्यावी निवेदन देतेवेळी संतोष भुतेकर मा सरपंच इसरूळ सचिन कदम मंडप गाव सरपंच अनिल चित्ते शिवसेना दे राजा तालुकाप्रमुख पांडुरंग देशमुख दीपक पुंगळे कृष्णा भुतेकर विनोद देशमुख गजानन देशमुख समाधान देशमुख गोपाल देशमुख पप्पू देशमुख यासह अनेक जण उपस्थित होते
Social Plugin