देगलूर (प्रतिनिधी) : राज्यसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉ. अजित गोपछडे साहेब देगलूर रेस्ट हाऊस येथे आगमन झाल्यानंतर, धनगर समाजाच्या वतीने तातडीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये समाजाच्या आण-बाण-शान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा देगलूर येथे उभारण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, निवेदन सादर होताच खा.डॉ.अजित गोपछडे साहेबांनी एक क्षणही न घालवता संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून, "सदर प्रस्ताव त्वरित माझ्या कार्यालयाकडे पाठवा," असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी वर्ष संपूर्ण देशभर साजरे केले जात आहे, त्यामुळे हा पुतळा उभारणे ही काळाची गरज आहे."
या वेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, व धनगर समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी साहेबांच्या सकारात्मक आणि तत्पर प्रतिसादाचे कौतुक केले.
या निर्णयामुळे धनगर समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची स्मृती जपण्याच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घडामोड ठरणार आहे.
Social Plugin