Ticker

6/recent/ticker-posts

लातूरच्या शेतकरी दप्त्याला अविनाश देशमुख यांच्याकडून मदतीचा हात



शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन कर्जाची केली फेड


ग्रामीण प्रतिनिधी/ प्रसाद दिनकरराव :

भारतातील अनेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. यामुळं भारताची जागतिक पटलावर कृषी प्रधान देश अशी ओळख आहे. 1 जुलैला राज्यभर कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्यानं एका वृद्ध दांम्पत्यानं स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा प्रकार लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती इथं घडला आहे. अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार असं सत्तरी ओलांडलेल्या शेतकऱ्याचं नाव असून कृषीप्रधान देशात जगाच्या पोशिंदावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात हाडोळती हे गाव आहे, हे मात्र विशेष. लातूरमधील या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शरद पवार गटाचे सरचिटणीस अविनाश देशमुख शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माहिती घेत आर्थिक मदतीचा हात दिला असून शेतकर्‍ यावर असणार्‍या जिल्हा बॅंक कर्जाची संपूर्ण रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली व अजून मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे ह्यावेळी राज्याचे माजी रोजगार हमी मंत्री विनायकराव पाटील, लातूर जिल्हा अध्यक्ष श्री संजय शेटय़े ,मुरबाड तालुका अध्यक्ष श्री दीपक वाघचौरे उपस्थित होते यामुळे अविनाश देशमुख यांचे या दप्त्याने आभार मानले असून महाराष्ट्रमधून त्यांचे कौतुक होत आहे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार या शेतकऱ्याला फोन करून मदतीचं आश्वासन दिलं आहे. तर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यानंही हाडोळतीच्या या शेतकरी वृद्ध दांपत्याला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 

विशेषता शेतीसाठी बैल नाही, पैसे नाहीत म्हणून स्वत:ला जुंपलं लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती इथले वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना दोन एकर नऊ गुंठे कोरडवाहू जमीन आहे. या शेतीवरच त्यांच्या सर्व कुटुंबाची उपजीविका भागते. या वृद्ध दांपत्याला एक मुलगा आणि मुलगी असे दोन आपत्ती असून मुलगा पुण्यामध्ये मजुरीचं काम करतो. तर मुलगी सासरी आहे. नातवंडांना घेऊन आजी-आजोबा हाडोळती या गावातच राहतात. हक्काच्या शेतीची मशागत करून मिळणाऱ्या उत्पादनात वर्षभराचा प्रपंच भागवला जातो. या वृद्ध दांपत्यानं लोकांकडून उसनवारी करुन शेतीची पेरणी केली. परंतू शेतात लागवड केलेल्या कापसाच्या पिकाची मशागत आणि बैल बारदाना यासाठी दिवसाला 2,500 रू एवढी महागडी रोजदांरी परवडणारी नाही. म्हणून वयाची सत्तरी गाठलेल्या अंबादास पवार यांनी स्वतःला नांगराला जुंपून घेत मशागतीची कामं पत्नी मुक्ताबाई पवार यांच्याकडून करून घेत असल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आलाय.