Ticker

6/recent/ticker-posts

धनगर पिंपरी येथील पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंना प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मोफत औषध वाटप



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून बसने पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या 140 वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धनगर पिंपरी येथील स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने आज दि 04/07/2025 रोजी मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात वारकऱ्यांना आवश्यक औषधे आणि आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला.यावेळी बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य सेविका प्रतिमा गंगाधरी, आरोग्य सेवक सर्जेराव पावशे म्हणाले"वारीमध्ये मोठ्या संख्येने जे भाविक बसने प्रवास करत आहे.त्यांना मळमळ व थकवा,खोकला,अंगदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही हे औषध वाटप शिबिर आयोजित केले आहे."

या शिबिरामध्ये ताप,डोकेदुखी,अतिसार,जुलाब, त्वचेचे आजार आणि इतर सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे वाटण्यात आली.तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सागताना पाणी उकळून पिणे आणि प्रवासात घ्यायची काळजी याबद्दल वारकऱ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून,या शिबिराला उपस्थित संजय(आबा)जाधव,संतोष मोढेकर,भागीरथ खांडेकर,प्रकाश ढवळे,सुनील खांडेकर,राजू माने,सोपान मोढेकर,सतीश खांडेकर,संतोष खांडेकर,रामेश्वर गोडसे,धनंजय मुळे,परमेश्वर आरगडे,रामेश्वर आरगडे,सोपान साळुंके,हनुमान खांडेकर,अशोक मुळे,वाल्मीक आधे,बबनराव जाधव,कैलास देवकर,ज्ञानेश्वर साळुंके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते..