Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर पोलिसांची धाडसी कारवाई!! 77 लाखाचा, गुटखा मुददेमालसह जप्त!!



मन्सूर शहा:---, 

प्राप्त माहितीनुसार मेहकर : 21/08/2025 रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की समृदधी महामार्गावरुन एका आयशर वाहनातुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक होत आहे यावरून त्यांनी सदर माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन पहाटे 04.00 सुमारास समृदधी महामार्गावरील नागपुर ते मुंबई वाहीनीवरील चॅनल नंबर 282 जवळ मिळालेल्या माहीतीचे अनुषंगाने सापळा लावुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची (गुटखा) वाहतुक करणारा एक आयशर टेम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्यात पुर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेल्या अनपदार्थाची (गुटखा) मिळुन आला.

त्यावरुन सदर मुददेमालावर कारवाई करणेकरीता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांना पत्र देवुन बोलावुन घेवुन मुददेमाल तपासला असता एकुण 65,52,000/- रु चा शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ (गुटखा) व 12,00,000 रु चे आयशर वाहन असा एकुण 77,52,000/- रु चा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. सदर गुन्हयात आतापावेतो एकआरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजुन आरोपी निष्पष्ण होण्याची शक्यता आहे. निष्पष्ण आरोपी पकडणेकरीता पथक तयार करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार हे करीत आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, पोउपनि वसंत पवार, पोउपनि गणेश कड, पोउपनि संदीप मेधने, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई, रमेश गरड, संजय पवार, सुरेश काळे, लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शरद कापसे, करीम शहा, इब्राहीम परसुवाले, शिवाजी चिम, संदीप भोंडणे यांनी तसेच अत्र व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांचे सहकारी यांनी मिळुन केलेली आहे. 

 One attachment

  •  Scanned by Gmail