Ticker

6/recent/ticker-posts

नातवाच्या दुर्दैवी मृत्यूचा मानसिक धक्का-आजोबांचाही मृत्यू



दिग्रस-दारव्हा परिसरात हळहळ दुर्दैवी संयोगाने दुहेरी शोककळा

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : दारव्हा येथे मंगळवारी (ता. २० ऑगस्ट) रेल्वे कामासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्यात चार अल्पवयीन मुलांचा करुण बळी गेला. या घटनेत १३ वर्षीय रैहान असलम खान हाही बळी ठरला. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच दिग्रस येथील रैहानचे आजोबा मुनीर खान शमशेर खान उर्फ मुन्नाभाई पेपरवाले (वय ६८) दारव्हा येथे पोहोचले. मात्र, एकुलत्या नातवाच्या अचानक मृत्यूचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांनीही रात्री दारव्ह्यातच अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक दुहेरी घटनेने परिसरात शोककळा पसरलीअसून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेवर्धा यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गाच्या उड्डाणपुलासाठी दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात मोठा खड्डा खोदण्यात आला होता. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या खड्यात पाणी साचले होते काल चार शाळकरी मुलांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला आण दुर्दैवाने चौघेही पाण्यात बुडाले. (वय १३) याचा देखील समावेश होता. ही बातमी कळताच दिग्रस येथील वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत असलेले रैहानचे आजोबा मुनीर खान आपल्या नातेवाईकांसह दारव्हा येथे गेले. 

तेथे मुलीच्या घरी रात्री थांबले असता, नातवाच्या मृत्यूचा जबर मानसिक आघात झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही देह ठेवला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित मुनीर खान मागील अनेक वर्षांपासून दिग्रस शहरात वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत होते. साधी सरळ जीवनशैली, बोलका आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. काल दिवसभर त्यांनी घरची कामे आटोपून अनेक मित्र- परिवारियांची भेट घेतली होती. रात्री सुमारे ११ वाजता अचानक त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आजोबा नातवाच्या मृत्यूचा दुर्दैवी योगायोग योगायोग संपूर्ण संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे. पत्रकार संघटनांसह असंख्य सर्वधर्मीय, सर्वपक्षीय बांधवांनी अंत्ययात्रेत हजेरी लावून कुटुंबाच्या दुःखात सहभाग घेतला.