किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक सदस्य दिपक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर तालुका पोलिस पाटील संघटनेची तालुका बैठक घेण्यात आली त्यात मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पदी नांदवेल गावचे पोलीस पाटील अनिल समाधान वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली
तसेच नरवेल गावचे पोलीस पाटील मुकेश महाजन यांची तालुका उपाध्यक्ष पदी व सुकळी गावचे पोलीस पाटील संदीप इंगळे यांची तालुका सचिव पदी तसेच माळेगाव गावचे पोलीस पाटील सर्वेश्वर पाटील यांची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यामुळे समस्त तालुका भरातून कार्यकारणीचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
Social Plugin