कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा- शहरात दिनांक १८ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.श्री शिव मंदिर, गायतोड़ इंझोरी येथून पवित्र जल घेऊन यात्रेची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात, हर हर महादेवच्या घोषणांनीवातावरण दुमदुमले. पवित्र तीर्थ क्षेत्रातून पवित्र जल आणून शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी कावड मंडळ सदस्य अनवाणी पायाने चालत आले होते. यात्रेत महिला, युवक तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शहरातील प्रमुख मार्गावरून ही यात्रा भव्य मिरवणुकीच्या रूपाने पुढे सरकली. मार्गावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवभक्तांनी नाचत गात कावड
वाहिली. नागरिकांनी ठिक ठिकाणी पाणी व प्रसाद वाटप करून यात्रेतील सहभागींचे स्वागत केले. शहरात आलेल्या विविध कावड मंडळांमुळे भक्तीमय उत्साह अधिकच बहरला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण कारंजा शहर भक्तिमय झाले होते. सावन महिन्यातील या कावड यात्रेमुळे शिवभक्तीचा उत्साह आणि धार्मिक वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळाले.
Social Plugin