Ticker

6/recent/ticker-posts

राजुरेश्वराच्या भेटीला भक्तांची मांदियाळी ,अंगरीका चतुर्थी निमित्ताने राजुरात उसळला जनसागर

 



चतुर्थीच्या मध्यरात्री चार लाख भाविकांनी घेतले दर्शन ,कन्नड तालुक्यातील निर्मळ कुटूंबाला पूजेचा मान.मंगळवारी दुपारपर्यत दर्शनपासचे सहा लाख रुपये जमा, व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल


टेंभुर्णी () प्रतिनिधी  विष्णु मगर 

गेल्या अनेक वर्षांपासून अंगरीका  चतुर्थी श्रावण मासात आल्याने जालना जिल्ह्यातील आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले.सोमवारी दुपारपासून छत्रपती संभाजी नगर, बुलडाणा, जालना,आदी जिल्ह्यातील भाविकाचे लोंढे रात्री राजुरेश्वर की जय,गणपती बाप्पा मोरया, आदी जयघोषात श्री क्षेत्र राजुरात दाखल झाले.सोमवारी रात्री बाराच्या सुमारास भक्तांच्या अलोट गर्दीने पूर्ण राजूर ढवळुन निघाले.

     दरम्यान सोमवारी रात्री बारा वाजता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,सौ निर्मलाताई दानवे,जालना जिल्हाधिकारी डॉ आशिमा मित्तल,राजुरेश्वर संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदन चे तहसीलदार अमोल पाटील,भोकरदन चे उपविभागीय अधिकारी डॉ बी सरवन,जाफराबाद च्या तहसीलदार डॉ सारिका भगत,,जिल्हा परिषद सदस्य सौ आशा पांडे,जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर सोनवणे,सरपंच सौ प्रतिभा भुजग, माजी सरपंच भाऊसाहेब भूजग,विनोद डवले,संस्थानचे विश्वस्त गणेश साबळे, सुधाकर दानवे,गजानन नागवे,बाबुराव खरात,भगवान नागवे,संस्थानचे प्रशांत दानवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

   यावेळी पूजेचे पाहिले मानकरी,छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील  साखरवेल गावातील कडूबाई चांगदेव निर्मळ या दांपत्याला मिळाला यावेळी यादांपत्याला राजुरेश्वर संस्थानच्या वतीने श्री ची प्रतिमा, व शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री च्या गाभाऱ्याला विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली असल्याने गाभारा आकर्षक दिसत असल्याचा छायाचित्रात दिसत आहे.

सोमवारी रात्री घेतले लाखो भाविकांनी घेतले दर्शन

सोमवारी रात्री नऊ वाजेपासून भक्तांनी श्री चे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.मोफत रांगेत उभे राहून जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज संस्थानचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे यांनी दिली.

 ऐनवेळी शंभररुपया वरून दोनशे रुपये दर्शन पास वाढ केल्याने भाविकांत नाराजी 

अंगरीका चतुर्थी असो संकष्ट राजुरात शंभर रुपये दर्शन पास नेहमी असायची परंतु या श्रावण मासातील अंगरीका चतुर्थीला अचानकपणे दोनशे रुपये दर्शन पास झाल्याने जिल्ह्यातील भाविकांत तीव्र नाराजी व्यक्त होत होत या दर्शन रांगेत दिवसभर शुकशुकाट पहायला मिळत संस्थान विरुद्ध तीव्र नाराजी भक्तांकडून बोलण्यात येऊन सामान्य रांगेत दर्शन घेतले.

दर्शनासाठी वशिलेबाजी 

जिल्ह्यातुन नव्हे तर महाराष्ट्र राज्यातून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री क्षेत्र राजुरात  दाखल झाले त्यांनी दर्शन घेण्यासाठी सोमवार रात्रीपासून सामान्य रांगेचा आसरा घेतला मात्र काही ठिकाणी दर्शनासाठी पोलीस अधिकारी, स्थानिकांकडून दर्शनासाठी वशिलेबाजी लावून दर्शन घेतले गेले.

जागोजागी साबुदाणा खिचडीचे वाटप

सोमवारी रात्री पासून राजुरात येणाऱ्या चोही मार्गाने सुमारे 50 ते 60 क्विंटल साबुदाणा खिचडी, चहा चे वाटप महाराष्ट्र राज्यातील अनेकांकडून करण्यात आले.विशेष म्हणजे विदर्भातील डेराजा येथील सुनील उराशी व गजानन खांदेभराड यांच्यासह अनेकांनी खिचडी वाटप केली.

पोलिसांची अरेरावी

राजूर पंचक्रोशीतीला जवळपास 50 ते 60 गावे जोडली असून अनेकांना काही कामानिमित्त जालना किंवा भोकरदन येथे जावे लागते. राजूर शहराच्या चोहूबाजूला सर्वच ठिकाणी पोलिसांकडून बॅरिगेट लावण्यात आले होते.त्यामुळे जालना किंवा भोकरदन छत्रपती संभाजी नगर जाण्यासाठी राजूरहुन जावे लागते परंतु राजुराच्या सगळीकडुन नाकाबंदी  असल्याने प्रवाशासह  अनेक रुग्णाना हाल सहन करावे लागले.