अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड धनगर पिंपरी,जि जालना-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धनगर पिंपरी येथे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जिजाबाई शिवाजी नरोडे यांची,तर उपाध्यक्षपदी किरण कैलास काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी ही नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे.
या निवडीसाठी शाळेत पालकांची एक खास बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची शपथ घेतली.यावेळी शिक्षणतज्ज्ञ ज्ञानेश्वर साळुंके यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर हे या समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.तसेच मंगेश तांबे,ममताबाई ठोंगे, अनुसया मिसाळ,दिलीप बर्डे यांसारख्या सदस्यांचाही यात समावेश आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष जिजाबाई नरोडे,उपाध्यक्ष किरण काळे आणि इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला पालक आणि शिक्षणप्रेमींचा मोठा सहभाग होता.सूत्रसंचालन आवारे सर आणि मोरे सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन आवारे सरांनी केले.
या नवीन समितीमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक उत्साहवर्धक होईल अशी आशा आहे.ही निवड शाळेच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे..
Social Plugin