Ticker

6/recent/ticker-posts

कावड यात्रेत संयम,धार्मिकता व साऊंड मर्यादेचे पालन करा-पोलीस निरीक्षक संजय चौधरी



मालेगाव प्रतिनिधी:–जावेद धन्नू भवानीवाले

   मालेगाव : आगामी कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी सर्व कावड भक्तांना संयम,शिस्त आणि धार्मिकतेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

     कावड यात्रा ही पवित्र श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा असल्याने ती शांततेत व नियमानुसार पार पाडणे आवश्यक आहे,असे त्यांनी स्पष्ट केले पोलीस निरीक्षक चौधरी म्हणाले की,“आपल्या कावड मंडळाच्या प्रतिष्ठेला कुठलाही गालबोट लागू नये याची काळजी घ्या आपण गावागावांतून पायदळ कावड घेऊन येतो, त्यामुळे तिचे महत्त्व जपणे आपले कर्तव्य आहे नियम व परंपरा पाळून,एका ओळीत आणि नम्रतेने यात्रा काढा.”

तसेच,त्यांनी यात्रेदरम्यान केवळ ‘भोलेनाथ’च्या भक्तिगीते वाजविणे अपेक्षित आहे ; अश्लील तसेच धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कोणत्याही प्रकारचे गाणे वाजवू नये,असे स्पष्ट केले. डीजे किंवा साऊंड सिस्टमचा आवाज मर्यादित ठेवावा,जेणेकरून नागरिक,रुग्णालयातील रुग्ण,विद्यार्थी किंवा वयोवृद्धांना त्रास होणार नाही कोणालाही त्रास होईल असे कृत्य करू नये,तसेच गर्दीत ढकलाढकली टाळावी,असेही त्यांनी सांगितले चौधरी यांनी सांगितले की,शांततेत,शिस्तबद्धतेने आणि धार्मिक पद्धतीने यात्रा काढल्यास भक्तीचा खरा संदेश समाजापर्यंत पोहोचेल त्यांनी सर्व कावड मंडळांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करत “भक्तीची ही वाट प्रेम,शिस्त आणि श्रद्धेने सजली पाहिजे” असा संदेश दिला.