Ticker

6/recent/ticker-posts

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने सुभेदार बासरे यांचा सन्मान



ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी आणि नुकतेच भारतीय सेनेत तब्बल ३० वर्ष आणि महाराष्ट्र पोलीस सेवेत ८ अशी ३८ वर्ष सेवा करून माजी सुभेदार तथा पोलीस शिपाई नागनाथ माणिकराव बासरे हे जुलै अखेरीस सेवानिवृत्त झाले.त्यांचा सैन्यदल,नांदेड पोलीस दल,बॅचमेट कर्मचारीवर्ग, काबरानगर ञीमूर्ती सोसायटी, कुलेकडगी समाज बांधव,शिक्षक परिवार, आप्तस्वकीय,मिञ परिवारासह आदिंच्या वतीने सेवानिवृत्त निमित्त ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला. रविवार दि.१० ऑगस्ट रोजी 'आदमपूरकर बासरे' परिवाराने नांदेड शहरातील ग्रँड मराठा हाॅटेल सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या द्वितीय सेवापूर्ती गौरव सोहळ्यात नांदेड उत्तर क्षेञाचे विद्यमान आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहत,बासरे परिवाराचा भव्य सन्मान करीत त्यांना शुभेच्छां देण्यात आल्या.आ.बालाजी कल्याणकर साहेबांचाही बासरे कुटुंबांनी भव्य सत्कार करीत आभार मानले!

प्रारंभी कुलदैवत श्री.सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सामुहिक वंदन करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन बळीराम सर, प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधर बासरे व इतर मान्यवर उपस्थित होते.तमलूर,ता.देगलूर येथील गळगे कुटुंब सासरवाडी  च्या वतीने बासरे यांचा कपडेरूपी आहेर भेट देत  यथोचित मान राखण्यात आला. विविध श्रेञातील मान्यवरांचा सहकार्यरूपी संदर्भात बासरे परिवाराकडून मंचावर गौरव करीत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.सैन्यदल,नांदेड पोलीस दल,वर्गमित्र,पञकार, आप्तस्वकीय मिञ परिवार व नागनाथ बासरे आदिंनी संक्षिप्त स्वरूपात मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास नांदेड, काबरानगर,हिंगोली ,मुखेड,आदमपूर ,तमलूर,गागलेगांव ,बोरगांव,येवती,खतगांव प्रतिष्ठित नागरिक,पञकार, राजकीय पदाधिकारी ,शिक्षक, गावकरी ,ग्रामविकास अधिकारी व्यंकट आदमपूरकर ,सहशिक्षक अरूण पाटील,गंगाधर बासरे,हणमंत बासरे,देवप्पा बासरे, विठ्ठल बासरे,शिवलिंग बासरे,गणेश बासरे,अंकुश बासरे, गळगे,गाढे परिवार,सायलू बोमडूले,जाफर आदमपूरकर  व विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. बहारदार सूत्रसंचालन संतोष मांडे यांनी केले.