Ticker

6/recent/ticker-posts

हरघर तिरंगा,वृक्ष लागवड हरितक्रांतीची हाक—गट विकास अधिकारी यांचे ग्रामपंचायतींना आवाहन



मालेगाव प्रतिनिधी): जावेद धन्नू भवानीवाले 

     मालेगाव: भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त मालेगाव पंचायत समितीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन 13 ऑगस्ट पासून करण्यात आले असून,त्यामध्ये हरघर तिरंगा व पाचशे वृक्षलागवड उपक्रम यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

    या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश कंकाळ यांनी संपूर्ण मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सचिव व सरपंचांना आवाहन केले आहे १३ ऑगस्ट पासुन ध्वजारोहण सोहळ्यानंतर,गावोगावी हरघर तिरंगा फडकावणे तसेच परिसरात ५०० वृक्षलागवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे,मालेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातही वृक्षलागवड करण्यात येणार असून,यामध्ये पंचायत समितीतील अधिकारी- कर्मचारी,विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी,तसेच स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत गट विकास अधिकारी रमेश कंकाळ यांनी सांगितले की,पर्यावरण संवर्धन व देशभक्तीचा संदेश यांचा सुंदर संगम घडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे यावेळी ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील नागरिक,शाळकरी विद्यार्थी,महिला बचत गट,युवक मंडळे आणि सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे लावलेले वृक्ष नियमितपणे पाणी देऊन व देखरेख करून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले स्वातंत्र्यदिना निमित्त या उपक्रमांच्या माध्यमातून हरितक्रांतीचा संदेश देत समाजात एकतेची भावना वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट पंचायत समितीने ठेवले आहे.