![]() |
अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले |
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 12 - वाशिम येथिल श्वेता पडघाने च्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वतीने मुख्यमंत्र्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वाशिम येथील रहिवासी असलेली श्वेता अजय पडघाने या मातेचा ता ५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसुती दरम्यान मृत्यू झाला आहे
श्वेता पडघानेना वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात वेळेत व योग्य उपचार मिळाले नाहीत दरम्यान रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर, कर्मचारी,व जिल्हा शल्य चिकित्सकांनी कर्तव्यातील कसुर व हलगर्जीपणा मुळेच श्वेताचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियां कडुन होत आहे तशा प्रकारची तक्रार श्वेताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासना सोबतच पोलीसात दिली आहे
त्यामुळे श्वेता पडघानेच्या मृत्यूची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करण्यात यावी व श्वेताच्या मृत्यूस जबाबदार असलेले डॉक्टर, कर्मचारी, व जिल्हा शल्य चिकित्सकांना सेवेतुन बडतर्फ करुन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जनआदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे
निवेदनाच्या प्रतीलीपी आरोग्य मंत्री .प्रकाश आबीटकर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ आणि पालकमंत्री दत्ताजी भरणे यांना देण्यात आल्या आहेत निवेदनावर समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे,जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल ढगे,सौं छायाताई मडके, सौं मीनाताई बगाडे, सौं राधाताई भंनंगे, भगवान मडके, यशवंत हिवराळे, चंद्रकांत गायकवाड,व्यंकटेश मडके आदींच्या सह्या आहेत .
Social Plugin