संघटन शक्ती राष्ट्रनिर्माणात महत्वपूर्ण
कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा(लाड) विश्वमांगल्य सभा, कारंजा शाखे द्वारा ३ऑगस्ट रोजी मातृशक्तीची भव्य कावड यात्रा उत्साहात झाली. या प्रसंगी कारंजा मानोरा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके यांनी कावडचे पूजन करून या कावडयात्रेचे उद्द्घाटन केले. कावड पूजनासाठी वंदनाताई मालपाणी, शिवकांताताई इन्नाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वमांगल्य सभा या मातृ संघटनेची गेल्या तीन वर्षापासून शहरात कावडची परंपरा सुरू झाली. या कावड मध्ये सर्व जातीच्या, सर्व समाजाच्या, सर्व स्तरातील महिला संघटित होत असल्यामुळे राष्ट्र निर्माण मध्ये ही संघटन शक्ती महत्त्वपूर्ण ठरते. सुरुवातीला टिळक चौकातील विहिरीच्या जलाची पूजा करून पवित्र सप्त नद्यांचे आवाहन केले. त्यानंतर तेथील नर्मदेश्वर महादेवाला श्री शिवमहिम्न अभिषेक करण्यात आला. यावेळेस निशाताई रॉय यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कावड पूजन होऊन कावड वाजत गाजत सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने निघाली. यावेळेस मातृशक्तीचा उत्साह वाखाणण्या
सारखा होता. सर्वत्र भक्तिमय वातावरण होते. या कावड यात्रेमध्ये सर्व महिलांनी दोन कलशांच्या छान कावड सजवून आणल्या होत्या. प्रत्येक समाजाने चौकाचौकामध्ये आपल्या समाजाचे लोकनृत्य सादर केले. बंजारा समाजाने त्यांचे लोकनृत्य, दुधोरा येथून आलेल्या महिलांनी पावली सादर केली. तसेच गुजराथी समाजाने गरबा नृत्य, चौका चौकात फुगड्या, डमरू पथक होते. काही महिला जयघोष करत होत्या. भजनी मंडळे भजन म्हणत होते. भारत मातेच्या भूमिकेत एकता गायकवाड या होत्या. नवदुर्गाची देखील झांकी महिलांनी साकारली होती. यात्रेमध्ये महिला मार्गक्रमण करत होत्या. झाकी मध्ये शंकरजी च्या भूमिकेत प्रिया अडुळकर, माता पार्वती च्या भूमिकेत ओवी ढाकुलकर तसेच गणपतीच्या भूमिकेत अनवेश पायल तसेच सिंधी समाजाचे संत झुलेलाल हरप्रित पंजवानी अशाप्रकारे मुलांनी देखील उत्साहात सहभाग घेतला. सिद्धेश्वर महादेव मंदिरात कावड पोहोचल्या नंतर तिथे कावडचे २१ कलश २१ जणींनी खांद्यावर घेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर कावडच्या जलाने सिद्धेश्वर महादेवाला श्री
शिवमहिम्न अभिषेक करण्यात आला
Social Plugin