Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्ह्यातील - १० आयडॉल शिक्षकाची निवड



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 


वाशिम जिल्ह्यातील १० आयडॉल शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा ने आयडॉल शिक्षकांमध्ये कारंजा व वाशिम पंचायत समितीमधील न तीन तर इतर चार पंचायत समितीमधील प्रत्येकी एका आयडॉल शिक्षकांचा समावेश आहे.

कारंजा पंचायत समिती मधून बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी चे मुख्याध्यापक विजय देविदास भड, जिल्हा परिषद शाळा वढवीचे गणेश लक्ष्मणराव राऊत, जिल्हा परिषद कन्या शाळा उंबरडा च्या शिक्षिका निशा काशिनाथ खुमकर, वाशिम पंचायत समिती मधून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा साखरा येथील विनोद बबनराव झनक व मीना नामदेवराव मापारी, जिल्हा परिषद

केंद्र शाळा उकळी पेन चे संतोष भागवत इडोळे, रिसोड पंचायत समिती मधून जिल्हा परिषद शाळा कंकरवाडीचे शंकर मोहन खानझोडे, मंगरूळपीर पंचायत समिती मधून जिल्हा परिषद शाळा चिखलीचे निलेश अरुण तुळजापुरे, मानोरा पंचायत समिती मधून जिल्हा परिषद शाळा रुद्राळा येथील एकनाथ भगवान मेश्राम, तर मालेगाव पंचायत समितीमधून जिल्हा परिषद शाळा उडी चे विशाल विनायक काटेकर या दहा शिक्षकाची वाशिम जिल्ह्यातील आयडॉल शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांचे अभिनंदन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विलास कडाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव आदींनी केले आहे