अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड शहरातील श्रद्धास्थान असलेल्या मत्स्योदरी देवी संस्थान येथे आज सायंकाळी सात वाजता पार पडलेल्या सायंकालीन आरती सोहळ्याला भक्तिभावाने सुरळीत सुरुवात झाली.या पावन प्रसंगी "महाराष्ट्र ग्रामीण न्यूज" चे पत्रकार व तालुका पत्रकार संरक्षण समितीचे सचिव गणेश मच्छिंद्र सपकाळ यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह देवीची आरती करण्याचा सौभाग्ययोग लाभला.
देवीच्या दिव्य मूर्तीसमोर दिपप्रज्वलन करून आरतीस प्रारंभ झाला आणि "जय मत्स्योदरी माते" च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.मंदिराच्या सभोवतालच्या गाभाऱ्यात दिव्य प्रकाशमान झाले होते आणि घंटानाद,शंखध्वनी तसेच मंत्रोच्चाराच्या नादात वातावरणात एक अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जा संचारली.
या मंगलमय आरती प्रसंगी संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे,पुजारी श्री गीताविलास कुंटेफळकर, तसेच कर्मचारी गोविंद कायस्थ,अर्जुन शिंदे,सुहास गुरव आदी उपस्थित होते.सर्व उपस्थित भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि भक्तिभावाने भरलेले हास्य दिसून येत होते. सांस्कृतिक परंपरेत मत्स्योदरी देवी आरती हा एक अतिशय पवित्र क्षण मानला जातो.या सोहळ्याला उपस्थित राहणे हे भक्तांसाठी भाग्याचे समजले जाते.आजचा आरती सोहळा हे भक्ती,निष्ठा आणि श्रद्धेचे सुंदर उदाहरण ठरले.
Social Plugin