Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळा बँकेच्या वतीने कोळगांवात एफएससी मेळावा


ग्रामीण प्रतिनिधि, महमदरफी मदार 

मुखेड:तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने परिसरातील कोळगांव गावात एफएससी कँप(मेळावा)गुरूवार दि.७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.त्यात गावातील शेतकरी व खातेदार यांच्यासह बँकेतील कर्मचारीवर्गाने संवाद साधत विविध बँकेतील योजनेसंदर्भात माहिती दिली.

सदरील बँकेच्या गाव पातळीवरील मेळाव्यात २० रूपये व ४३६ रूपये विमा,आरडी,केसीसी रिनिवल साठीचे अर्ज भरून घेण्यात आले.आवर्ती ठेव योजना,एक रकमी सवलत योजनेंतर्गत  नवसंजीवनी योजना,शेतकरी समाधान योजना,उद्योजक दिलासा योजना,गटबंधन सहायता योजनेसह पाञ खातेदार, नवीन कर्ज,योजनेचे स्वरूप,योजनेचा कालावधी आदि थकीत खातेदारांसाठी मर्यादित कालावधी संधीची माहिती देण्यात आली.आरबीआय तर्फे शासन व बँकांसाठी आलेल्या मार्गदर्शक परिपञकाप्रमाणे शासकीय कर्जमाफी योजना,संभाव्य परिणाम व भविष्यात शासकीय कर्जमाफी झाल्यास नियमित कर्ज धारक शेतकर्‍यांना न वगळता 

त्यांना पीककर्ज नूतनीकरण व शासनाच्या व्याज सवलत संदर्भात सखोल मार्गदर्शन करीत मेळावा यशस्वी करण्यात आला. सदरील मेळाव्यास चांडोळा बँकेचे उप शाखाव्यवस्थापक बबलेश पाटील,मुख्य रोखपाल शुभम शेळके,कार्यालयीन सहाय्यक महमदरफी मदार,मिनी शाखेचे मदन पाटील,गंगाधर दस्तूरे,केरबा गायकवाड, कोळगांव सरपंच शिवाजी श्रीरामे,रास्त भाव दुकानदार गोविंद श्रीरामे,बाबूराव गायकवाड,पोलीस पाटील गणपत इबितदार,माजी सरपंच गंगाधर गायकवाड,चेअरमन देविदास पाटील,तुकाराम सावरगावे,शिवाजी साखरे,मारोती गायकवाड,गौतम गायकवाड आदि शेतकरी,गावकरी यांची उपस्थिती होत   ,