लोहा / प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनंमत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व लोहा लिंबोणी गल्लीतील डॉ.हेलन केलर अंध निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना केळी, सफरचंद हे फळे व पारले बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत भाऊ लांडगे,शेवडीचे बा.चे मा.सरपंच कैलास धोंडे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शेलगावकर , सेवा जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष गोविंद हाबगुंडे ,शिवा संघटनेचे लोहा शहराध्यक्ष सुर्यकांत आणेराव,शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष वैभव हाके, पेनुरचे सरपंच - दामु पाटील वाके,शिवा विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष राजकुमार पिल्लोळे,शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधु पाटील वडजे,शेखर शेट्टे ,शुभम ठाकुर , चंद्रकांत बेद्रे सर,गोविंद आनेराव,रवि होळगे,हरी वड्डे, अरुण राईकवाडे, कल्याण वसमतकर, ------ आदी उपस्थित होते.
हनमंत भाऊ लांडगे यांचे लोहा शहरात ठिकठिकाणी अभिष्टचिंतन
सामाजिक शैक्षणिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनंमत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लोहा शहरातील राजाराम नगर, मुक्ताईनगर,सायाळ रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,मोंढा याॅर्ड,मेन रोड लोहा, शिवकल्याण नगर,आदी विविध ठिकाणी त्यांचा अनेक मान्यवरांनी शाल, पुष्पहार घालून पेढे भरवून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून भव्य अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा वर्षाव केला.
प्रा.मनोहर धोंडे सर यांनी दिल्या भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा
शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनंमत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांनी भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या.
Social Plugin