जिल्हाधिकारी संतोष पाटील हे पूरपरिस्थितीची पाहणी करण्या करिता पाटण दौऱ्यावर आले असता मराठा क्रांती मोर्चा समितीचे पाटण तालुका समन्वयक यशवंतराव (बाबा) जगताप, गणेश नायकवडी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मराठा क्रांतीचे समन्वयक व तहसिल कार्यालय यांच्या कुणबी नोंदीच्या मोडीतील वाचन व लिप्यांतरण बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे तहसीलदार अनंत गुरव यांनी कुणबी समाजाला दाखले मिळावे म्हणून सर्वतोपरी सहकार्य करत आहेत अनेक दाखले त्यांनी वितरित केले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे. मोडी लिपीतील दाखले लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कसे मिळतील याकडे लक्ष द्यावे यावेळी आपण उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नक्कीच लोकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
Social Plugin