बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शिक्षणाबरोबर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्यांचा विकास शालेय पातळीवर होत असतो. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या विक्री करत असताना त्यांच्यातील संवाद कौशल्य व व्यवस्थापन कौशल्य यांचा विकास होताना दिसून येतो. श्रम प्रतिष्ठा मूल्याची रुजवणूक अशा उपक्रमातून होत असते .
असे विचार खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मा सोनाली विभूते मॅडम यांनी व्यक्त केले. त्या श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगाव येथील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
"संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय अभ्यासक्रमावर तसेच तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण दिले जात असून अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे आहेत. व्यवसायात यशस्वी झाले आहेत. संस्कार व व्यवसायाचे शिक्षण देणारी ही एक आदर्श संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हे प्रदर्शन सर्वांना दिशादर्शक ठरेल असे विचार संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी आपल्या भाषणात विचार मांडले. मुख्याध्यापिका सौ नीलम खटावकर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास संस्था सचिव श्री. मोहनराव जाधव, विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव, श्री एस.आर. पाटील, विस्तार अधिकारी श्री. शिवाजीराव कदम, केंद्रप्रमुख श्री नवनाथ गावडे, श्री ऋषिकेश जाधव, सौ ज्योती गायकवाड, सौ.विद्या घाडगे, सौ.हेमलता फडतरे, प्राचार्य श्री दत्तात्रय गोफने, प्रा. जे. बी. जाधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. श्री अशोक लहारे यांनी आभार मानले.
Social Plugin