( ज्ञानेश्वर ठोके @ प्रतिनिधी ग्रामीण न्यूज )
अंतर्गत आज दिनांक 04/08/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिराचे आयोजन हे वाजेगाव मंडळातील मौजे वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले .या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जिवंत सातबारा योजनेअंतर्गत सातबारा, अपाक नोंदी कमी केलेले 7/12 , रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र,नॅशनॅलिटी, रहिवाशी प्रमाणपत्र, हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे, ई पिक पाहणी तसेच विविध शासकीय योजनेची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला गावातील सरपंच दत्ता गोविंदराव जाधव , सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,रेशन धान्य दुकानदार, मुख्याध्यापक, वाजेगाव मंडळाचे मंडळाधिकारी पी.पी. बडवणे सर , वाजेगाव मंडळातील ग्राम महसूल अधिकारी दिलीप पवार, एम के पाटील , नागलमे मॅडम, ग्रामविकास अधिकारी धर्माधिकारी साहेब, कृषी सहाय्यक श्रीमती राठोड मॅडम, महसूल सेवक श्रद्धा सूर्यवंशी, संतोषी कर्डिले , सेतू चालक एकनाथ ठोके , ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.🙏
Social Plugin