Ticker

6/recent/ticker-posts

हर-हर महादेव च्या गजरात देगलूर - करडखेड पदयात्रा संपन्न



पदयात्रेचे 13 वे वर्ष पदयात्रेत हजारो महिला-पुरुषांचा सहभाग 

महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सुख, शांती आणि शेतकऱ्यांसाठी घातले साकडे

देगलूर -: दर वर्षाप्रमाणे यावर्षीही तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली. येरगीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संतोष पाटील यांच्याकडून आयोजित पदयात्रेचे हे 13 वे वर्ष असून 18 ऑगस्ट 2025 रोज सोमवारी सकाळी ८ वाजता बंडयाप्पा मठ संस्थान गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आले. यावेळी शिवाजी देशमुख बळेगावकर, प्रकाश पाटील बेंबरेकर, अशोक साखरे, नंदकुमार दाशेटवार, महेश पाटील, अनिल बोन्लावार,डॉ. उत्तम इंगोले,डॉ. सुनील जाधव, भावना दाशेटवार, डॉ संजय इंगळे, अनिल पाटील खानापूरकर, लक्ष्मीकांत पदमवार , अंकुश देसाई देगावकर, रमेश जाधव टाकळीकर,अशोक गंदपवार,शैलेश उल्लेवार,कैलास येसगे, डाॅ.ईगोले, डॉ.रवींद्र भालके,डॉ. राहुल माका,सचिन पाटील कारेगावकर,अरुण पाटील रामपुरकर, अशोक जुबरे, सौरभ मदुरवार, आदि उपस्थित होते .

दरवर्षी हि पदयात्रा येरगीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते. महिला,युवती व बालिकांवरील अत्याचार कमी व्हावेत ,बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी ,चांगला पाऊस पडावा,दुष्काळ परिस्थिती दूर होण्यासाठी सर्व शिवभक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले .देगलूर ते करडखेड शिवमंदिर पर्यंतचा १५ किमी च्या पदयात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्कृति इंग्लिश स्कुल, केतकी संगमेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी देगलूर, कपिल एकलारे ,डॉ. बालुरकर, डाॅ.किरण बिरादार शिवणीकर, संतोष नारलावर, अक्षय टेलर, डाॅ.अमित देगलूरकर, कावळगावचे परमेश्वर आगडे, शिवदास बिरादार, यांच्याकडून पाणी ,चहा ,साबुदाणा खिचडी,फळे आदींचे वाटप करण्यात आले. 

पदयात्रेत शिव स्तुती गायन-भजन ,या बरोबर महिला भजन मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला .गुरुराज माऊली च्या नामस्मरणात पाऊले टाकत ,टाळ-मृदंगाच्या गजरात व शिवनामाच्या घोषात ही पदयात्रा बंडयाप्पा मठापासून अण्णाभाऊ साठे चौक,देगलूर महाविद्यालय ,होट्टल फाटा,कारेगाव,बल्लूर फाटा,चाकूर फाटा ,कावळगाव ,बोरगाव मार्गे करडखेड येथील पुर्वारेश्वर महादेव मंदिरात दुपारी १२.३० वाजता पोहचली. पश्चात तेथे महादेवाची आरती पदयात्रा संयोजक संतोष पाटील व सहभागी शिवभक्तांच्या वतीने करण्यात आली .पदयात्रेमध्ये शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी देगलूर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडून शिवभक्तांसोबत औषधी व सोबत डॉक्टर्स,नर्स यांची टीम उपलब्ध करून देण्यात आली होती.तसेच 25 युवकांच्या स्वयंसेवकाच्या टीमने पदयात्रेमध्ये सुव्यवस्था व ट्रॅफिक नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष परिश्रम केले. पदयात्रेत स्वच्छता राखण्यासाठी देगलूर स्वच्छतेचा जागर समितीचे सूर्यकांत सुवर्णकार आणि इतर सदस्यांनी परिश्रम केले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील, सचिन देशमुख, इरवंत कालिंगवार ,गजानन भोकसखेडे,शिवकुमार पाटिल, महिला - पुरुष भजनी मंडळ आदींनी परिश्रम केले.