Ticker

6/recent/ticker-posts

ठेकेदाराणी शहरातून डिव्हाइडर केले नसल्याने दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत



हिमायतनगर  प्रतिनिधी:- उत्तम पाईकराव 


हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात काहीजणांनी जीव गमावला तर काहीजण लुळे ,पांगळे झाले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून हिमायतनगर शहरातून डिवाइडर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देत नसल्याची भावना अपघात झालेल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. हिमायतनगर शहरातील अपघाताच्या नियंत्रणासाठी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निवडून आलेल्या कोणत्याही खासदार, आमदाराने यासाठी प्रयत्न केले नाही त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे .आज भर दिवसा एक टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला यामध्ये दोघा जणांना जबर मार लागला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू आहे.

तर ऑटो मधील अनेक जण किरकोळ जखमी झाले असले तरीही अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत हिमायतनगर पोलिसात कोणतेही नोंद झालेली नसले तरी हजारो नागरिकांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट आणि दुर्लक्षित कामाबाबत नाराजी व्यक्त केले आहे तसेच अनेकांनी रस्त्याच्या मधून दुभाजक म्हणजेच डिवाइडर करून आगामी काळात होणाऱ्या संभाव्य अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या दोन्ही बाजू उड्डाणपुलाचे काम आणखी काही जणांचे जीव गेल्याशिवाय करणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .आता तरी राजकीय पुढारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन हिमायतनगर शहरातील मंजूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर आणि उड्डाणपुलाचे काम करून भविष्यात होणारे अपघात तळतील काय का याकडे शहरी व ग्रामीण भागातील जनते चे लक्ष लागले आह.