देगलूर(प्रतिनिधी):
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येथील येथील बालिका पंचायत राज समितीच्या वतीने गावातून भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळेचा दरवर्षी भारतीय सीमेवरील जवानांना ३३३३ राख्या पाठवण्यात येतात. त्यांचा या उपक्रमाचा हा 12 वा वर्ष असून त्यात येरगी बालिका पंचायत सहभागी झाले आहे.
येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन या उपक्रमाची माहिती गावचे सरपंच संतोष पाटील यांनी दिली . यावेळी बालिका पंचायतचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवकत्ते व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.या उपक्रमासाठी बालिका पंचायत,शाळेतील मुली आणि गावातील महिला सामील होऊन देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राख्या व त्यासोबत सदिच्छा पत्र पाठवले आहेत .सदरील राख्या भारतीय सीमेवर असणाऱ्या जवानांना राखी पौर्णिमेच्या दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी गावचे सरपंच संतोष पाटील,मुख्याध्यापक अशोक देवकत्ते शिक्षक ईश्वर वाडीकर, भुमन्ना तेलगे, राहुल ढगे, रमाकांत वाघमारे, अंगनवाडी कर्मचारी गंगामणी दारलावार, हानमाबाई बरसमवार, शितल मटपती, मजुळा सिलमकुटवार, नागमणी बरसमवार तसेच बालिका पंचायत राज समितीचे सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पुनम सुर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दाणेवार, पोलिस पाटील अनिता बागेवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सपना कालिंगवार, तंटामुक्त अध्यक्ष शिवकांत भुरळे, ग्रामपंचायत सदस्य रूद्राणी चैडके, महादेव कुंचगे, रितीका चिटकुलवार, हरीका तोटावार, महादेव गोशेट्टी, आश्विनी लोहार,मोनीका माळगे आदी उपस्थित
Social Plugin