Ticker

6/recent/ticker-posts

नागेश्वर माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण



भवाडा प्रतिनिधी- पी के गावित

    भवाडा येथे, नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धा 2025  ( NSPC ) हरित जीवनशैली द्वारा समर्थित पर्यावरण वन आणि जलवायू मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.

                  प्रा. हंसराज पवार यांनी वृक्षारोपणाची प्रस्तावना सांगितली. तर नितीश आहेरे झाडाचे महत्व पटवून सांगितले.आणि सेवावर्धिनीचे ग्राम सहाय्यक पुष्पराज गावीत यांनीही सहभाग नोंदविला. प्रा. मनाले की, झाड हे सृष्टीसाठी आणि माणसासाठी फार महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरासमोर एखादं तरी झाड लावणे अपेक्षित आहे. झाडांपासून येणारा ऑक्सिजन आणि उन्हाळ्यात सावली तर काही झाडे फळ देणारे असतात. आणि त्यातून आपण पैसे ही कमवू शकतो. अशा वेगवेगळ्या भागांमध्ये पानझडी असतात, तर काही सदाहरित पाहायला मिळते.

                   सेवावर्धिनीचे गावित यांनी असे सांगितले की, जास्तीत जास्त वृक्षारोपण कसं होईल आणि या पृथ्वीवरती सगळीकडे वृक्षचवृक्ष होतील. आताच्या काळात वृक्ष किती कमी होत आहेत. फार चिंतेची बाबा आहे.शेवटी गावित यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन केला आहे की. एक माणूस एक वृक्ष असा संदेश दिला.