सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली शहरात प्रथमच भव्यदिव्य दहीहंडीचे साथ फाऊंडेशन आणि रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावली तर्फे आयोजनसंगीताच्या तालावर उपस्थितांनी धरला ठेका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायिका इशरत जहाँ, लावण्यवती आस्था वांद्रे यांची उपस्थिती
सावली - दिनांक २०/०८/२०२५
सावली येथे दिनांक १९/०८/२०२५ मंगळवारी प्रथमच साथ फाऊंडेशन व रोहीत भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावलीच्या वतीने गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी सपर्धेचे आयोजन सावलीतील पंचायत समिती समोरील पटांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेत एक लाख रुपये व ट्रॉफी हा पुरस्कार जय शीतला माता गोविंदा पथक चंद्रपूर ने पटकावला तर द्वितीय पारितोषिक ५१ हजार व ट्रॉफी भंडारा येथील जय श्री महाकाल गोविंदा पथकाने पटकावला, या स्पर्धेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण वातावरण गोविंदामय झाले.
या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन चिमूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बंटीकुमार भांगडीया यांच्या हस्ते करण्यात आले आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक मान्यवर होते. या स्पर्धेला प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुंबई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ आणि लावण्यवती आस्था वांद्रे यांनी प्रेक्षकांना संगीताच्या तालावर ठेका धरायला लावला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहीहंडी स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष साथ फाऊंडेशन रोहित भाऊ बोम्मावार यांनी केले यावेळी त्यांनी साथ फाऊंडेशन च्या माध्यमातून भविष्यात होणाऱ्या कार्याची माहिती दिली, आज जशी सर्वांची साथ लाभली तशी नेहमीच आपली साथ असू द्या असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. जे. आकाश व कु. अंकिता यांनी केले, तर आभार प्रदर्शन साथ फाऊंडेशनच्या सचिव डॉक्टर रुपाली रोहित बोम्मावार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साथ फाऊंडेशन व रोहीत भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावली ने अथक परिश्रम घेतले.
Social Plugin