मालेगाव प्रतिनिधी-ः जावेद धन्नू भवानीवाले
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांसाठी आपले आयुष्यच नव्हे तर तन मन धन खर्ची घातले असून कुटुंब आणि परिवार पणाला लावून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळेच आज आपण ताठ मानेने जीवन सुखमय पणे जगत आहोत असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातून आलेले मनजीत सिंह नौटियाल यांनी केले. ते पंचशील धम्म ध्वज यात्रेत बोलत होते.
या धम्म ध्वज यात्रेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नौटियाल यांनी बौद्ध संस्कृती जतन करणे आजच्या बौध्दांचे परम कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपण ती जबाबदारी म्हणून महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाचा एक भाग झाले पाहिजे असे प्रतिपादन केले आहे.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी ॲक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही पंचशील धम्मध्वज, जनसंवाद यात्रा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रनेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या प्रमुख नेतृत्वात वाशीम ला १८ ऑगस्ट ला मुक्कामी आली होती. तर १९ ऑगस्ट रोजी मालेगावला येण्यापूर्वीच पूज्य भदंत विनाचार्य यांना तातडीने गुजरात दौऱ्यातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जावायचे होते त्यामुळे ते वाशीम येथील त्यांच्या धम्मदेसने नंतर निघून गेले मालेगाव येथे ते या यात्रेत सहभागी झाले नाहीत.
तर या पंचशील धम्म ध्वज यात्रेचे दुसरे महत्त्वाचे भिक्खू पूज्य भन्ते ज्ञानज्योती (महाथेरो) , ताडोबा - चंद्रपूर हेही बऱ्याच उशिरा पोहोचल्याने अगदी उशिरा साडे सात वाजता धावती भेट देऊन यात्रेच्या पुढील प्रवासासाठी पूढे निघून गेले.महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रेची सुरुवात नागपूर येथील पावन दिक्षाभूमीतून 17 ऑगस्ट 2025 पासून झाली आहे आणि ती चैत्यभूमी मुंबई येथे जात आहे. ही यात्रा 19 ऑगस्ट रोजी मालेगाव शहरात दाखल झाल्यावर तिचे उत्साहात पंचशील धम्म ध्वज यात्रा स्वागत समितीचे वतीने बाळासाहेब सावंत व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भिक्खू संघाचे भन्ते करुणासागर (उत्तराखंड), भन्ते अभयबोधी (वर्धा), भन्ते उत्तमबोधी (दिल्ली), भन्ते कुसलचित्त (नागपूर), भन्ते उपाली (दारव्हा), या धम्म ध्वज यात्रेचे समन्वयक राकेश धारगावे, बुध्दिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र, जिल्हा समन्वयक विनोद डेरे, सिमा डेरे, शालीनी मनवर, शीला घोडेस्वार यात्रे समवेत होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अनिल तायडे व अखिल भारतीय समता सैनिक दल सब डिवीजन चे आकाश इंगळे, वैशाली गवई, रामभाऊ कहाळे, संजय भगत यांच्या समवेत स्त्री पुरुष पथकाने उपस्थित भिक्खू संघास मानवंदना दिली. यात्रे सोबत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जे एस शिंदे व सुधाकर पखाले यांनी तर आभारप्रदर्शन राहूल तायडे यांनी केले.
या महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रेचे वाशीम जिल्ह्यात कारंजा,मंरुळपिर, वाशीम नंतर मालेगाव भेटीत जागृती मैदान,नागरदास व मेडशी येधील बौध्दांनुनयाचे आग्रहाने धावत्या भेटीत स्वागत स्विकारून रात्री उशिरा पुढील प्रवासासाठी पातूर कडे ही यात्रा रवाना झाली. त्यांचा मुक्काम चिंचोली तालुका बार्शी टाकळी येथे होणार आहे.
Social Plugin