Ticker

6/recent/ticker-posts

जवळकी गावाचा खड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा ? जनतेला पडलेला प्रश्न



ईसाक शेख :- नांदगाव 

   नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून जवळ असलेले जवळकी गावाची रस्त्यांची अवस्था मात्र दैनिय झाली आहे खड्यात रस्ता आहि कि रस्त्यात खड्डा हे समजण्या च्या पलीकडे आहे. बोलठाण  मुख्य बाजार पेठे पासून हाकेच्या अंतरावर गाव असून सुद्धा वर्षांन वर्षा पासून रस्त्याच्या प्रश्न सुटत नाही. ह्या रस्त्यांवर कांदा व्यापऱ्यांचे खळे असून दररोज 400 ते 500 शेतकरी वाहन कांदा विक्री साठी जवळकी येथील व्यापाऱ्यां कडे आणतात मात्र रस्त्याची गैर सोय असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे  वेळोवेळी अपघात होत असतात.तसेच शालेय विध्यार्थी यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे.

     तालुक्याचे लाडके आ. माननीय सुहास अण्णा कांदे यांनी विशेष लक्ष घालून आमचे रस्त्याचे प्रश्न सोडवावे अशी जवळकि येथील जनतेची अपेक्षा आहे.