प्रतिनिधी :-सागर इंगोले 

मुकुटबन,. येडशी रोड वरील विद्या नगरी वार्ड नं. 5 मधील शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरो फिल्टर एक वर्षांपासून सुरु झालेले आहे. त्या फिल्टर चे दूषित अतिरिक्त पाणी हॆ त्याच फिल्टर च्या संपूर्ण भागात पसरले असल्यामुळे या विद्यानगरीतील नागरिकांना फिल्टर चे पाणी घेण्यासाठी त्या साचलेल्या दूषित पाण्यामधून जाऊन पाणी घ्यावे लागत आहे.  हॆ पाणी गेल्या एक वर्षांपासून येथे जमा झाल्यामुळे येथील नागरिकांना त्या सतत जमा झालेल्या सांडपाण्यामुळे त्या पाण्यावर डेंगू, मलेरिया, सारखे मच्छर तय्यार होऊन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्केता नाकारता येत नाही. व ते जमा झालेले दूषित पाणी येथील अनेक नागरिकांच्या घरात घुसत आहे.त्यामुळे या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. व हॆ पाणी फिल्टर पासून वाहत येथील जाणारा येडशी रोड वर पसरत असल्यामुळे सतत च्या मुरलेल्या पाण्यामुळे त्या रोडला मोठमोठे खड्डये या पाण्यामुळे रोडला पडले आहे. तरी या परिसरातील नागरिकानीं ग्रा. पं.पदाधिकाऱ्यांवर अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.व याकडे ग्राम पं. चे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.