Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्हा कारागृहात मैत्री फाउंडेशन आणि जय सोशल फाउंडेशनच्या महिलांनी एकत्र येऊन बंदिवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा दिवस केला साजरा




बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

बहिण भावाचे नाते अबाधित रहावे यासाठी मैत्री फाउंडेशन आणि जय सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सातारा जिल्हा कारागृहात रक्षाबंधन दिवस साजरा केला जात आहे. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके व विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या आदेशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.              

मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजना रावत यांच्यासह जय सोशल फाउंडेशन च्या महिलांनी एकत्र येऊन कारागृहातील बंदिवानांना राख्या बांधून हा रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला आहे... दरवर्षी या फाउंडेशनच्या वतीने सातारा जिल्हा कारागृहातील बंदिवानांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश कदम, तुरूंग अधिकारी मुक्ता तडाखे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार अहमद संदे, वंदना पवार, वैशाली फडणीस, हेमलता जगताप, नीता राजपाल सदस्य, सीमा जाधव, सविता कदम, , शिपाई संकेत जाधव, प्रतिक्षा मोरे, अश्विनी पुजारी, गिता दाभाडे, रूपाली नलवडे, रविराज शेळके, ज्ञानेश्वर गायकवाड, सागर देवकर, प्रशांत कदम, वैभव पाटील, किरण यादव, सचिन चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.