भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा-17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत विशेष मोहीमसर्व नागरीकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. समन्वय-1 दिनांक 01 सप्टेंबर, 2025 अन्वये, महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचे दृष्टीकोनातून भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत “सेवा पंधरवाडा ” राबविण्याकरिता दिनांक 01 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हे अभियान “पाणंद रस्ते विषयक मोहिम”, “सर्वांसाठी घरे” या उपक्रमासाठी पुरक उपक्रम आणि “जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नाविन्यपुर्ण उपक्रम” अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सेवा पंधरवाडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये शिव/ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
भुरभुशी ह्या गावामध्ये सेवा पंधरवाडा साजरा झाला





Social Plugin