निळकंठ वसू
आलेवाडी, दि. १७ सप्टेंबर – ग्रामपंचायत आलेवाडी येथे प्रभारी सरपंच श्री. राम वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा उत्साहात पार पडली. ग्रामविकास अधिकारी एस. एम. बदूकले मॅडम, रोजगार सहाय्यक अनिल भोंगळ, माजी पोलीस पाटील श्री. बळीराम वानखडे, माजी सरपंच गणेश पाटील वानखडे, तसेच छावा उपजिल्हा प्रमुख श्री. निवृत्ती पाटील यांची ग्रामसभेला उपस्थिती लाभली.
ग्रामसभेत विविध विकासकामांवर चर्चा झाली. पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा, आणि रोजगार हमी योजनेबाबत गावकऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. ग्रामविकास अधिकारी बदूकले मॅडम यांनी शासकीय योजनांची माहिती दिली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ग्रामसभा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा झाली. शेवटी सरपंच राम वानखडे यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानत ग्रामसभेचा समारोप केला.





Social Plugin