अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर होताच सर्व पक्षीय इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत.अनेकांप्रमाणे माझी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असे मत सुदर्शन राऊत यांनी पक्षश्रेष्ठीकडे बोलून दाखवले व त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे.गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात,सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात जनतेच्या सेवेची कामे देखिले करण्यात आली आहे.

यांचा जनसंपर्क देखली मोठ्या प्रमाणात असुन ते तळागाळातील लोकांशी जोडले गेले आहेत.नवीन सुशिक्षित उमेदवार निवडून येणे परीसरातील विकासाला नव्या शिखरावर घेऊन जाईल असे मत सुदर्शन राऊत यांनी व्यक्त केले.