प्रतिनिधि :-आकाश कोके
सिल्लोड : दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी सकाळी 8:30 वाजता ग्रामपंचायत पिंपळगाव पेठ येथे तत्कालीन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतील एक दिवस गावकऱ्यांसोबत (ग्रामदरबार) नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन तेथे गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध विभागांच्या विविध योजनांविषयी सर्व विभागातील अधिकारी यांनी ग्रामस्थांना माहिती देऊन योजनेचे निकष समजावून सांगण्यात आले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती सिल्लोड येथील
विस्तार अधिकारी अण्णासाहेब गाडेकर, कृषी अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी सिरसाठ, केंद्रप्रमुख बडक, मुख्याध्यापक सुर्यवंशी . समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शेख, प्रकल्प अधिकारी सुनिता सनांन्से पशुसंवर्धन पर्यवेक्षक फुलार, पाणीपुरवठा विभाग अविनाश चौधरी कनिष्ठ अभियंता, गृहनिर्माण अभियंता शिंदे जलसंधारण विभाग कर्मचारी, ग्राम महसुल अधिकारी
बागुल, गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, मुख्याध्यापक, सरपंच दिलीप जाधव, उपसरपंच कांताबाई भागवत, ग्रामपंचायत सदस्य, कदीर सय्यद, राजेन्द्र बेलेवार, व ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार सदाशिव फुले, माजी सरपंच, माजी उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत अधिकारी अशोक महाकाळ, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin