वैभव सोळंके/तालुका प्रतिनीधी माजलगाव 

सादोळा गावचे भुमिपुत्र उत्तम कवी व लेखक असलेले प्राध्यापक भारत सोळंके यांचा जिवन प्रवास व काव्यवाचनाचा (अक्षरलेणी) मराठी साहित्य विषयक कार्यक्रम शनिवारी होणार आहे तरी त्यांच्या आयुष्यातील साक्षीदार असलेल्या लोकांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे तथा टॅम्पो ड्रायव्हर ते प्राध्यापक असा शिक्षणासाठी मोठा संघर्ष करणारे ते माजलगाव तालुक्यात तरी एकमेव व्यक्तीमत्व आहे त्यामुळे उत्सुकता आहे, भारत सोळंके हे विविध मासिक, दिवाळी अंकात लेखणी करत असतात त्यांचा पि.एच.डी चा विषय हा कुसुमाग्रज आणि गुलजार यांच्या कवितेचा तौलनीक अभ्यास हा आहे. मराठी भाषेवर त्यांचे भरपूर प्रेम असुन नवोदितांना मराठी साहित्यात ऋची निर्माण व्हावी या साठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो,२२ नोव्हेंबर रोजी शनिवार सकाळी ११ वाजता बीड आकाशवाणीवरून कार्यक्रम प्रसारित होणार आहे तरी नक्की आनंद घ्या.