बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
कृष्णा भारत गॅस एजन्सी पुसेगाव यांच्या वतीने श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यामिक विद्यामंदिर बुध मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला . यावेळी कृष्णा भारत गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक श्रीमती जयश्री हरिश्चंद्र मॅडम यांनी गॅस वापरा बाबत माहिती सांगितली . न चुकता रात्री गॅसचा रेग्युलेटर बंद करावा . गॅस गळतीमुळे आग लागून आपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे . गॅस चा पाईप त्यावरील एक्सपायरी तारीख पाहून बदलणे , तसेच गॅस बचतीसाठी कोणत्या उपाय योजना केल्या पाहीजे यासंदर्भात माहिती दिली . तसेच गॅस ची शेगडी , बर्नर हे साफ करून घ्यावेत .
घरगुती गॅस गळती मुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना बद्दल सविस्तर माहिती दिली .विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला .यावेळी विद्यालयाच्या वतीने जयश्री हरिश्चंद्र मॅडम चा सत्कार चंदा वाईकर मॅडम यांनी केला .तसेच अमोल फडतरे व किसन औतडे यांचा सत्कार तानाजी पाटील , नाना दडस यांनी स्वागत केले त्याचबरोबर 8वी शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक रूपचंद बोराटे सर यांचे स्वागत प्राचार्य भांगरे सर यांनी केले . उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरा केला . तसेच सानिका बुधवले मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले .





Social Plugin