Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. बी.आर. कत्तुरवार यांचे ‘लोकप्रशासन व महिला सक्षमीकरण पुस्तक प्रकाशित



देगलूर:- 

अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. बी.आर. कत्तुरवार व सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाच्या प्राध्यापिका डॉ उर्मिला रेड्डी यांनी संपादीत केलेले ‘*लोकप्रशासन व महिला सक्षमीकरण* पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. प्रा कतूरवार यांचे एकूण १७ पुस्तके व संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण  १० ( दहा) विद्यार्थ्याना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. याशिवाय ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली शाखा नांदेडचे सचिव पदावर कार्यरत असुन ते जिल्हाधिकारी तथा IIPA चे पदसिद्ध अध्यक्ष श्री राहुल कर्डीले (आय. ए. एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषयात संशोधन, प्रशिक्षण , प्रशासकीय सुधारणा यासाठी कार्य करित आहेत. तसेच द फोरम ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन: प्रोफेसर्स, एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स & स्कॉलर्स चे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र संशोधन व मान्यता समितीचे (RRC)सदस्य , स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड व य.च. म. मु. विद्यापीठ, नाशिक येथे लोकप्रशासन प्रशासन अभ्यास मंडळ (BOS) सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे लोकप्रशासन आर.आर.सी. समिती सदस्य , चेतना महाविद्यालय, मुंबई येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य व रुग्ण सेवा मंडळ, देगलूर सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

 प्रा कतूरवार यांनी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील कार्यालय, प्रा डॉ संजय देबडे, अधीक्षक गोविंद जोशी व प्रा यादव भुयारे यांच्यासह सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.