भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
राजकारणात पद म्हणजे काटेरी मुकूटच असतो.
पद स्वीकारल्यानंतर घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी धैर्य लागते. कारण एखादा निर्णय चुकला आणि निवडणुकीत अपयश आले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या नेतृत्वावरच येते. अशीच कठीण कसोटी भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यासमोर होती.
उमरेड आणि भिवापूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये आनंदराव राऊत यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी योग्य, विश्वासार्ह आणि सक्षम उमेदवारांची निवड केली. त्यांच्या या निर्णयावर जनतेने विश्वास दाखवत दोन्ही ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना दणदणीत मताधिक्याने विजयी केले.
यासोबतच भिवापूरमध्ये भाजपचे ८ नगरसेवक, तर उमरेडमध्ये १४ नगरसेवक मोठ्या बहुमताने विजयी झाले. या निकालामुळे आनंदराव राऊत यांच्या अचूक राजकीय निर्णयक्षमता, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुणांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या विजयामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण म्हणून आनंदराव राऊत यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले असून, पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे..





Social Plugin