पारनेर प्रतिनिधी :
आज वासुंदे येथील आरुष ज्ञानेश्वर केदार वय वर्ष सात याचा दोन महिन्यापूर्वी हात मोडला होता आणि त्याचे घरीच आयुर्वेदिक उपचार चालू होते परंतु जास्त त्रास होऊ लागल्यावर त्यांनी श्री हॉस्पिटल वासुंदे चे सर्वेसर्वा डॉ उदय बर्वे यांच्याकडे आल्यावर त्यांनी परिस्थिती टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्रशेठ राजदेव यांना तत्काळ सांगितल्यावर त्यांचे पेपर मागवून घेतले ,रेशनकार्ड मध्ये नाव नव्हते , रविंद्र राजदेव यांनी आज तत्काळ दाखला बनवून घेऊन स्वतः नगर येथे हॉस्पिटल मध्ये नेऊन दिला .
या गरीब बालकाला मदत मिळाली आणि त्याच्या हातावरील शस्त्रक्रियेचा मार्ग हराळ हॉस्पिटल अहिल्यानगर येथे मोकळा झाला. आदिवासी समाजातील जनतेने डॉ उदय बर्वे आणि रविंद्र राजदेव यांचे मनापासून आभार व्यक्त केले.





Social Plugin