बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
नेर तलाव भरभरून वाहत असताना सुद्धा नेर कालव्यास पाणी सोडलेले नाही . पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत . त्यामुळे कालव्यास पाणी सोडावे , शेतकऱ्यांचा अंत पाहू नका , असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला . अडीच हजार शेत्र या कालव्याच्या पाण्याखाली सिंचनास येतं .पुसेगाव खटाव ,खातगुण ,दरुज, दरजाई, .जाखणगाव, सिद्धेश्वर कुरवली ,भाडेवाडी, हुसेन्पुर , नागाचे कुमटे या गावांना या पाण्याचा लाभ मिळतो .परंतु संबंधित विभाग याकडे कायम उदासीन असतो . मतदारसंघात दोन लोकनियुक्त आमदार आहेत . पण याकडे जातील लक्ष घालत नाही असे दिसत आहेत . जर वर्षी पिके सुखायला लागली तरी पाणी सोडण्याचे नियोजन होत नाही यावरून प्रतिनिधींची निष्क्रियता दिसते .सारा भाग ओलिताखाली आला तरी नियोजना अभावी पिकाचे लाखो रुपये नुकसान होत आहे .याविषयी शेतकरी उदासीन व आक्रमक असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा विभागाने पाणी सोडावे अन्यथा शिवसेना गनिमी काव्याने पाणी सोडेल असा इशारा शेतकरी सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला





Social Plugin