प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
लोणार:-
आज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, महारचिकना .येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.एस.एच.जाधव साहेब (केंद्रप्रमुख अंजनी खुर्द) हे होते .तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बद्रीनारायण कायंदे साहेब (जामदार ,बीबी पोलीस स्टेशन), श्री शिवाजीराव ढाकणे (सरपंच) श्री. सुभाष पाटील ढाकणे संस्थेचे सहसचिव श्री .राहुल भाऊ शिंदे (सरपंच) श्री .रमेश भाऊ भागडे (उपसरपंच) श्री. दत्ताभाऊ लादे श्री. सखाराम भाऊ गायकवाड श्री. शरद फड (शाळा समन्वयक )श्री. कांता भाऊ सानप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस एस ढाकणे सर हे होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळा संबंधित मार्गदर्शन केले व खेळाचे महत्व सांगितले .यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .वानखेडे सर (पर्यवेक्षक) यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पळसकर सर (विभाग प्रमुख)यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्री. गायकवाड सर यांनी केले.यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





Social Plugin