प्रतिनिधी अनिकेत चांदणे
अंदुरा केंद्राची माहे जानेवारी २०२६ मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नया अंदूरा येथे सकाळी १०.३० वाजता उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या शिक्षण परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. इंगळे सर हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शाळा बोरगाव वैराळे येथील मुख्याध्यापक श्री. परघोरमोर सर व अंदुरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दिलीप ठाकरे सर यांची उपस्थिती लाभली.परिषदेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थीनिहाय कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याबाबत श्री. सचिन शिराळे सर यांनी सविस्तर माहिती दिली व शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना अंतिम स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
PGI कार्यमान प्रतवारी निर्देशांक सुधारण्यासाठी यू-डायस प्लस, PM POSHAN, PRABANDH व विद्यांजली पोर्टल यांवरील माहिती अचूक व वेळेत भरण्याबाबत केंद्रप्रमुख श्री. दिलीप ठाकरे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यांजली पोर्टलवर १०० टक्के शाळांची नोंदणी व उपयोग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
निपुण भारत अध्ययन स्तर चाचणीमध्ये १०० टक्के विद्यार्थी लक्ष्य प्राप्त केल्याबद्दल जिजामाता विद्यालयाच्या शिक्षकांचे विशेष स्वागत व अभिनंदन करण्यात आले. हे यश शिक्षकांच्या मेहनतीचे व नियोजनबद्ध अध्यापनाचे फलित असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
तसेच आदर्श BLO म्हणून पुरस्कार प्राप्त अंदूरा येथील विद्यामंदिर शाळेतील *श्री. भगत सर* यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला.आदर्श विज्ञान शिक्षक श्री. निलेश धांडे सर यांनी हॅकेथॉनबरोबरच ISRO मधील आपले अनुभव शेअर करून शिक्षक व विद्यार्थ्यांना नवोन्मेषासाठी प्रेरित केले.
याप्रसंगी अंदुरा केंद्रातील TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचे केंद्रप्रमुख श्री. दिलीप ठाकरे सर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तसेच दि. ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमस्थळी आकर्षक व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नया अंदूरा येथील मुख्याध्यापक श्री. प्रमोद बगले व सहाय्यक शिक्षिका कु. ज्योती वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर शिक्षिका कु. वर्षा वयले यांनी केलेले सुंदर व विषयानुरूप फलक लेखन विशेष लक्षवेधी ठरले व उपस्थितांकडून त्यांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. इंगळे सर* यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून निपुण भारतसह विविध शैक्षणिक उपक्रमांत मिळालेल्या यशामध्ये जिल्हा परिषदेचा मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच झालेल्या सत्कार व सन्मानाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून शिक्षकांना पुढील काळातही सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण कार्य करण्याचे यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन शिराळे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्ह्यातील उत्कृष्ट तंत्रस्नेही श्री. सुरेश पोते सर यांनी केले.अंदुरा केंद्रातील सर्व शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून शिक्षण परिषदेमध्ये उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविला.
ही शिक्षण परिषद शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी, शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.





Social Plugin