--मन्सूर शहा :-----
आज धोत्रा भंनगोजी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज (रविदास) जयंती १ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ पौर्णिमेला धोत्रा भ. येथे चर्मकार बांधवांनी जयंती साजरी केली जरी केली , जी १५ व्या शतकातील महान समाजसुधारक, कवी आणि भक्ती चळवळीतील संतांच्या जन्माची स्मृती आहे त्यांनी 'मन चंगा तो कठोती में गंगा' यांसारखे संदेश देत समानता, जात-पात विरहित समाज आणि कर्मवादाचा उपदेश दिला .
संत रोहिदास महाराज जयंती विशेष: प्रमुख बाबी
संत रविदास यांचा जन्म वाराणसी येथील मांडूर गावी माघ पौर्णिमेला झाला.
त्यांनी कर्मप्रधान समाज रचना आणि मानवतेचा संदेश दिला, जात-पात व भेदभाव यांवर जोरदार प्रहार केला
भक्ती चळवळ: १५-१६ व्या शतकातील भक्ती चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते, तसेच त्यांनी कबीर पंथाशी साधर्म्य दर्शवणारी विचारधारा मांडली.
त्यांनी आपल्या भजनांद्वारे आणि दोह्यांद्वारे त्यांनी समाजात जागृती घडवून आणली, त्यांच्या साहित्याचा प्रभाव पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत आहे.
जयंती : या दिवशी विशेष कीर्तन, नगर कीर्तन, भजनांचा संग्रह आणि लंगर (सामुदायिक भोजन) आयोजित केले जाते.
रोहिदास महाराजांचे प्रसिद्ध संदेश (दोहे)
"रविदास जन्म के कारनै, होत न कोउ नीच, नकर कूं नीच करि डारि है, ओछे करम की कीच" (माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ-कनिष्ठ ठरतो).
"मन चंगा तो कठोती में गंगा" (मन शुद्ध असेल तर देवाची पूजा करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही)
त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी मिरवणुका आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात. संत रोहिदास महाराज जयंती निमित्त धोत्रा. भ. येथे चर्मकार बांधव व गावकऱ्यांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करत असताना मुख्याध्यापक श्री महाले सर यांनी. संत रोहिदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत. तरुण मंडळांनी व्यसनमुक्ती कडे वळावे. असे मोलाचे संदेश आपल्या मार्गदर्शनातून दिले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री महाले सर, पत्रकार मन्सूर शहा अशोक भोसले विवेक पवळ, सुनील सोनारे,विलास सोनारे, सुरज सोनारे, आसारामजी सोनारे अंबादास सोनारे, सोनू गुजर, माता भगिनी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच संत रोहिदास महाराज जयंती आयोजित मंडळातर्फे, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सुनील सोनारे व विलास होणारे यांनी मानले.





Social Plugin