देवगड प्रतिनिधी ग्रामीण महाराष्ट्र न्यूज अमोल शिर्के
गाव पुरळ कलंबई विकास मंडळ यांनी आपल्या वाडीमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२६ या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले गेलेले आहेत. आपणास असे कळवण्यास विशेष आनंद होत आहे की विद्यमान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती अशी आहे की माननीय श्री नितेश जी नारायणराव राणे मंत्री मत्स्य विकास व बंदर विकास मंत्री यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. व त्यांची उपस्थिती ही फार मोलाची आहे. कलंबई विकास मंडळ रजिस्टर मुंबई यांचे सुवर्ण महोत्सव वर्ष २०२६ या मंडळाने विविध कार्यक्रम आखले गेलेले आहेत त्यामध्ये आरोग्य विषयी मोफत डोळे तपासणी, ज्येष्ठ नागरिक सत्कार, कार्यक्रमाचे उद्घाटन रंगमंचावरचे कार्यक्रम एकेरी व समूह नृत्य ग्रुप डान्स, त्यानंतर सदगुरू श्री वामनराव पै जीवन विद्या ज्ञान साधना केंद्र देवगड,हरिपाठ व प्रबोधन प्रबोधनकार श्री शंकरराव बांद कर बेळगाव यांचे प्रवचन, स्वच्छता अभियान, श्री सत्यनारायणाची महापूजा व महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू, स्थानिक सुस्वर भजने, आणि विशेष म्हणजे माननीय श्री नितेश जी नारायणराव राणे मंत्री यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन हे होणार आहे.
त्याचप्रमाणे महिलांचा डबलबारीचा जंगी सामना हा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये बुवा सौ.. ज्योती पुजारे मांडवकर. श्री गजानन प्रसादिक महिला भजन मंडळ पॉबुर्ले विरार यांच्याविरुद्ध बुवा कु. कीर्ती पुजारे. श्री माऊली प्रसादिक महिला भजन मंडळ नाडण यांचे जंगी सामने येथे होणार आहेत. असे हे कलंबई विकास मंडळ रजिस्टर मुंबई यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२६ यांनी असे हे विविध कार्यक्रम योजलेले आहेत तेव्हा सर्व ग्रामस्थ यांनी या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमास उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भी पुजारी, श्री शशिकांत आंबेरकर उपाध्यक्ष, श्री प्रभाकर मुळम अध्यक्ष, शाखा व कोषा अध्यक्ष श्री संजय मुळम, श्री अमोल पुजारे सरचिटणीस, श्री विजय गो.मुळंम शाखा सरचिटणीस, व अनेक मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांचा या कार्यक्रमात हिरा हिरीने सहभाग असणार आहे व फार मोलाचा वाटा असणार आहे तेव्हा सर्व ग्रामस्थ व गावातील सर्व मंडळींनी या कार्यक्रमास हजर राहावे ही नम्र विनंती





Social Plugin